कासोदा ता.एरंडोल – येथील रहिवासी बेबाबाई भिकन सूर्यवंशी (सुतार) हे दि. १३ रोजी नाशिक येथे आई आजारी असल्यानें त्यांच्या भेटी साठी गेल्या असता . घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप व खिडकी कापून घरात प्रवेश केला व गोदरेज कपाटातील रोख रक्कम व चांदीचे दागिने लंपास केले.
सुर्यवंशी हे आपल्या मुलासोबत नाशिक येथून घरी परत आल्याअसता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी पोलीस पाटील ,राजेंद्र महाजन यांना ही वार्ता कळवली व मुलगा स्वप्निल यांनी पोलिस पाटील यांच्या मदतीने जवळील कासोदा पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्या विरुद्ध तक्रारी अर्ज दिला असुन पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी रविंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय नरेश ठाकरे , व पोहेकॉ नंदू पाटील हे घटनास्थळी पोहचून प्रत्यक्ष पाहणी केली, व अज्ञात व्यक्ती विरोधी कासोदा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याचे सांगितले , व पोलीस सूत्रां नुसार पुढील तपास पोहेकॉ नंदू पाटील हे करीत असल्याचे समजते.