नेरी ता. जामनेर आज जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई महाजन यांच्या शुभहस्ते 30लक्ष रुपयांच्या सार्वजनिक सभामंडप व १0लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्त्यांच्या कामाचा,10 लक्ष रुपयाचे प्लेवर ब्लॉक बसविणे या कामांचा भुमिपुजन सोहळा पार पडला.
यावेळी जे के चव्हाण , तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर,जामनेर तालुका एज्युकेशन शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील,जि प सदस्या सौ.विद्याताई दिलीप खोडपे , प्रा .शरद पाटील सर , प.स .उपसभापती लोखंडे , प स गटनेते अमर पाटील , सरपंच नीताताई पाटील , सरपंच भगवान इंगळे, प्रभाकर पाटील , अनिल पाटील , जगन्नाथ झाबरे , ग्रामविकास अधिकारी दिपक शिंदे , रवी बाविस्कर , सुरेश पाटील, दिपक गोळवे , प्रदीप चोपडे , कल्पेश बेलदार , संतोष कुमावत , मनोज लोहार , डॉ प्रवीण पाटील यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..!कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पाचपोळे ,तर आभार प्रदर्शन पितांबर भावसार यांनी केले.