पाळधी,(प्रतिनिधी)- येथिल इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे आज दि. 11/10/2021रोजी नवरात्री निमित्ताने “जागर स्त्री शक्तीचा ” या कार्यक्रमा अंतर्गत आज सौ. वैशाली विसपुते संस्थापिका निधी फाऊंडेशन यांना आमंत्रित करण्यात आलं होत. या वेळी सौ. वैशाली विसपुते यांनी विद्यार्थिनीना वैयक्तिक स्वच्छता आणि सुरक्षा याबददल सखोल माहिती मार्गदर्शन केलं.सोबतच “गुड टच आणि बॅड टच “यातला फरक विद्यार्थीनीना समजावुन सांगितले.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष इंजि. श्री. नरेश पी चौधरी यांचा हस्ते सौ. वैशाली विसपूते संस्थापक अध्यक्षा (निधी फाऊंडेशन) यांना शाल, सन्मान चिंन्ह देउन सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी प्रमुख अतिथी श्री.सुर्यकांत विसपुते आणि नंदलालजी तिडके यांची हि कार्यक्रमास उपस्थिती होती.
या वेळी शाळेचे प्राचार्य, श्री. महेश कवडे , समन्वयक. जी.डी.पाटील व सौ. विद्या पाटील व समस्त शिक्षक व शिक्षके-तर कर्मचारी उपस्थित होते.