पारोळा येथे नगरपालिकेच्या वतीने व्यापार्यांची बैठक
पारोळा – पारोळा येथे व्यापारी व व्यवसायीकांची नगरपालिकेच्या वतीने बैठक घेण्यात आली होती त्यात पारोळा येथे नव्यानेच रूजू झालेले मुख्यअधिकारी विजयकुमार मुंडे यांनी मागॅदशॅन करीत सांगीतले की प्लास्टिक बंदी कायद्याने आपले व पयाॅवरणाचे च फायदे आहेत. त्यामुळे सर्व व्यापारी वगाॅने यात स्वता सहभागी होऊन प्रशासनास सहकार्य केले पाहिजे. कायद्याने सवॅ गोष्टी होत नाही परंतु सहकार्याने सर्व गोष्टी साध्य करता येतात, त्यामुळे व्यापार्यांनी ज्या प्लास्टिक वर बंदी घालण्यात आली आहे, त्याचा वापर टाळावा जेणेकरून आपले व पयाॅवरणाचे ही नुकसान होणार नाही,,
५० माक्रोनपेक्षा कमी जाडी च्या प्लास्टिक वापर करणर्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी सुचना देण्यात आली, ही बैठक पुवॅ सुचना देण्यासाठी आवर्जून आयोजित करण्यात आली आहे, या पुढे कागदी पिशव्या किंवा कापडी पिशव्याचा वापर करावा,जेणेकरून आपल्या भागातील बचत गटांना ही त्यांचा फायदा होईल असे ही सांगण्यात आले, कॅरीबॅग चा वापर सहसा टाळावा जर कोणी कॅरीबॅग वापरत असेल तर त्यावर कंपनीचा शिक्का व शासनाच्या परवाना नंबर व त्रिकोणमध्ये १ते ५ नंबर असलेल्या पाहिजे जे शासन मान्य आहे, यावेळी अनेक लहान मोठ्या व्यापार्यांनी आपल्या शंकाचे निरसॅण करून घेतले, अनेक जण आप आपल्या दुकानातील मालासह पिशव्या घेऊन आले होते, सवॅाचे समाधान मुख्यअधिकारी यांनी केले, यावेळी परत सवॅाना सुचना वजा ईशारा देण्यात आला की कोणीही कॅरीबॅग चा वापर करू नये अन्यथा दंडात्मक कारवाईला समोरे जावे लागले, या वेळी व्यापारी एसोसिएशन कडून मुख्यअधिकारी विजयकुमार मुंडे यांच्या शाल श्रीफळ देऊन अमृत कलेक्शन चे मालक केशव क्षत्रिय यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी स्वागतासाठी आणलेल्या बुकेला ही प्लास्टिक आवरण असल्याने मुख्यअधिकारी यांनी बुके दाखवत सुचना केली की याला ही बंदी आहे, यावेळेस सभागृहात एकच हास्य कल्लोळ झाला, या प्रसंगी शहरातील विविध प्रकारच्या व्यवसाय करणारे व्यापारी उपस्थित होते ज्यात विलास वाणी, महेश हिंदुजा, चुनिलाल भंडारी, मनोहर हिंदुजा, अरूण वाणी, धर्मेंद्र हिंदुजा, माणीक जैस्वाल, अशोक लालवानी, संजय कासार, मनोज शिरोळे, नितीन जुमडे,गिरधर लुल्ला,हिरानंद हिंदुजा, अनिल कासार, समाधान ठाकरे, याच्या सह अनेक व्यापारी एसोसिएशन चे पदाधिकारी उपस्थित होते,खेळीमेळीने बैठक संपन्न झाली. शेवटी सवॅाना नगरपालिकेच्या वतीने सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.