जळगाव- केंद्रीय ग्राहक, अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.रावसाहेबजी दानवे हे मंगळवारी जळगाव जिल्ह्यात आले होते. ना.दानवे यांनी दुपारी महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष ना.डॉ.गुरुमुखजी जगवानी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ना.रावसाहेबजी दानवे, राज्य पर्यटन मंत्री ना.जयकुमारजी रावल, माजी मंत्री आ.एकनाथरावजी खडसे व ना.जगवानी यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर ना.दानवे यांचा ना.डॉ.जगवानी यांनी सत्कार केला. प्रसंगी भाजप जेष्ठ नेते आ.एकनाथरावजी खडसे, आ.राजुमामा भोळे, लखीराम जेठाणी, सौरभ केसवानी उपस्थित होते.