भुसावळ- येथील बाजारपेठ पोलिस ठाणे व तालुका पोलिस ठाण्यात दाेन सहायक पोलिस निरीक्षकांच्या नियुक्ती जिल्हा पोलिस अधीक्षक डाॅ. पंजाबराव उगले यांनी साेमवारी केल्यात. बाजारपेठ पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक अनिल माेरे तर तालुका पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक रूपाली चव्हाण यांची नियुक्ती करण्यात अाली अाहे.
येथील तालुका पोलिस ठाणे, बाजारपेठ पोलिस ठाण्यातील दुय्यम पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने त्याच्या रिक्त जागेवर नवीन अधिकारी नियुक्त करण्यात अाले. बाजारपेठ पोलिस ठाण्यात पुणे ग्रामीण येथून अालेले सहायक पोलिस निरीक्षक अनिल माेरे तर तालुका पोलिस ठाण्यात सातारा येथून बदलून अालेल्या सहायक पोलिस निरीक्षक रूपाली चव्हाण यांची नियुक्ती करण्यात अाली अाहे.