धुळे/नंदुरबार : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या निकालाकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. अटीतटीच्या लढतीत भाजपच्या कोळदे गटामधील सुप्रिया गावित विजयी झाल्या आहेत. सुप्रिया गावित या खासदार हिना गावित आणि आमदार विजयकुमार गावित यांच्या कन्या आहेत. सुप्रिया गावित यांनी शिवसेना उमेदवाराचा 1269 मतांनी पराभव केला आहे.
तर दुसरीकडे धुळे जिल्ह्यात गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षांची कन्या धरती देवरे या लामकने गटातून विजयी झाल्या आहेत. धरती देवरे लामकने गटातून भाजप कडून निवडणूक लढवत होत्या. धरती देवरे या गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या कन्या आहेत. गेल्या वेळेस धरती देवरे बिनविरोध विजयी झाल्या होत्या.
दरम्यान, विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आपण लढवली होती आणि मतदारांनी आपल्या पदरात मते टाकली असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया गावित यांनी दिली आहे. सुप्रिया गावित यांनी शिवसेना उमेदवाराचा 1269 मतांनी पराभव केला आहे.
नंदुरबारमध्ये काँग्रेसने खाते उघडले असून म्हसावद गटातून काँग्रेसच्या हेमलता शितोळे विजयी झाल्या आहेत. हेमलता शितोळे यांनी भाजप उमेदवार शशिकांत पाटील यांचा पराभव केला आहे. हेमलता शितोळे यांनी 1923 मतांनी विजय मिळवला आहे.