शिर्डी : राज्यात ७ ऑक्टोबर पासून धार्मिक स्थळे सुरु होणार आहे. दरम्यान, साई बाबांच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तांना यापुढे साई बाबांच्या दर्शनासाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही. कारण शिर्डीतील साई बाबा मंदिर 7 ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांसाठी खुले केले जाईल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच मंदिरात गर्दी होऊ नये यासाठी शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्ट कडून नियमावली जाहीर कऱण्यात आली आहे.
त्यानुसार दररोज 15 हजार भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. तर साईबाबांची काकड आरती , माध्यान्ह आरती, सायंआरतीसाठी 80 भाविकांना सशुल्क प्रवेश देण्यात येणार आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे. पाहूयात कशी आहे ही नियमावली.
काय असतील नियम –
7 ऑक्टोबरपासून मंदिर 5 हजार पेड पास आणि 5 हजार ऑनलाईन आणि 5 हजार ऑफलाईन पासची सुविधा लोकांना देणार आहे. साई मंदिरात एकूण 15 हजार भाविकांना प्रवेश दिला जाईल. प्रत्येक तासाला 1150 भाविक साई मंदिरात प्रवेश करू शकतील. त्याचबरोबर प्रत्येक आरतीसाठी फक्त ८० भाविकांनाच प्रवेश दिला जाईल. सर्व भाविकांना मास्क घालणे बंधनकारक असेल. मंदिरात 2 नंबरच्या प्रवेशद्वारातून येण्याची तसेच 4 आणि 5 क्रमांकावरून बाहेर जाण्याची सुविधा देण्यात आली आहे.
काय बंद राहील-
मंदिराच्या काही खोल्या बंद आहेत आणि काही खुल्या राहतील. यामध्ये, ध्यान मंदिर आणि पारायण कक्ष बंद राहतील, तर साई मंदिर दर्शन, निवास व्यवस्था, रेस्टॉरंट, ऑनलाइन-ऑफलाइन प्रणाली, मंदिराचे दैनंदिन कार्यक्रम चालू राहतील. गर्भवती महिला, 10 वर्षाखालील मुले आणि 65 वर्षांवरील लोकांना मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी नाही.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्यात येणार आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.