काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा रात्री उशीरा लखीमपूर खिरीमध्ये आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी जात असतांना पोलिसांनी त्यांना मध्यरात्री ताब्यात घेण्यात आले होते, प्रियंका गांधी गेल्या २८ तासापासून ‘नजरकैदेत’ आहेत दरम्यान प्रियंका गांधी यांनी ट्विट करत मला विना FIR चे गेल्या 28 तासापासून ताब्यात घेण्यात आले असल्याचं म्हटलं असून अन्नदात्या शेतकऱ्यांना चिरडणाऱ्याना अद्याप पोलिसांनी अटक केली नसल्याने प्रश्न उपस्थित केला आहे.
.@narendramodi जी आपकी सरकार ने बग़ैर किसी ऑर्डर और FIR के मुझे पिछले 28 घंटे से हिरासत में रखा है।
अन्नदाता को कुचल देने वाला ये व्यक्ति अब तक गिरफ़्तार नहीं हुआ। क्यों? pic.twitter.com/0IF3iv0Ypi
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 5, 2021
प्रियंका गांधी यांना नजरकैद करून ठेवण्यात आलेल्या उत्तर प्रदेश येथील सीतापूर मधील पीएसी छावणी गेट समोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून रात्री हातात दिवे घेऊन शहीद शेतकऱ्यांना मौन धारण करून श्रद्धांजली वाहिली आहे.तर प्रियंका गांधी यांचा काय गुन्हा आहे असा सवाल उत्तर प्रदेश काँग्रेस कडून उपस्थित करण्यात आला आहे दरम्यान उत्तर प्रदेश काँग्रेसनं ट्विट करून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी रविवारी मध्यरात्रीनंतर लखीमपूर खेरीला रवाना झाल्या होत्या मात्र लखीमपूर खेरीला पोहोचण्यापूर्वी पोलिसांनी प्रियंका गांधींना हरगाव येथून ताब्यात घेतले होते उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अजूनही ‘नजरकैदेत’ ठेवले आहे.
आंदोलन और तेज होगा। सरकार तानाशाही कर रही है। कांग्रेस महासचिव श्रीमती @priyankagandhi जी का क्या गुनाह है? उन्हें क्यों गिरफ्तार किया गया है?
करारा जवाब मिलेगा।#किसान_के_साथ_प्रियंका #लखीमपुर_खीरी_नरसंहार pic.twitter.com/OlHhmI5JVn
— UP Congress (@INCUttarPradesh) October 4, 2021
दरम्यान हरगाव येथे पोलिसांनी प्रियंका गांधी यांना पीडित शेतकऱ्यांना भेटू न देताच त्यांना ताब्यात घेण्यात आलं यावेळी प्रियंका गांधी यांनी पोलिसांना विना वॉरंट मला अटक करू शकत नाही असा जाब विचारला…. मला वॉरंट दाखवा… मला अटकेचं कारण सांगा असं वारंवार सांगताना दिसत ट्विट केलेल्या व्हिडिओत दिसत आहे.
सीतापुर में कांग्रेस महासचिव श्रीमती @priyankagandhi जी अभी भी हिरासत में हैं।
पीएसी छावनी के गेट पर हजारों की तादात में कार्यकर्ताओं ने शहीद किसानों के नाम पर मौन रखकर श्रद्धाजंलि दी।#PriyankaGandhi#किसान_के_साथ_प्रियंका pic.twitter.com/bPIlOxHxf1
— UP Congress (@INCUttarPradesh) October 4, 2021