मुंबई, विवीध मागण्या पूर्ण न झाल्याने अखेर आज 1 ऑक्टोबर पासून राज्यातील निवासी डॉक्टर संपावर गेले असल्याचे ‘मार्ड’ ने कळविले आहे.शासन दरबारी गेल्या अनेक दिवसांपासून विविध मागण्या प्रलंबित असल्याने त्या पूर्ण होतं नसल्याने, मागण्या संदर्भातशासन गंभीर नसल्याने आजपासून निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत.
वेळो वेळी मागण्यांबाबत मार्ग काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र याबाबत राज्य सरकार निर्णय घेऊन मागण्या पुर्ण करत नसल्याने आज 1 ऑक्टोबर पासून राज्यातील सुमारे 5 हजार निवासी डॉक्टर संपावर गेले असल्याची महाराष्ट्र निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटनेच्या वतीने दिली आहे.
दरम्यान मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागातील सेवा बंद राहतील तर अत्यावश्यक व अतिदक्षता सेवा सुरू राहतील अशी माहिती मिळत आहे.