नाशिक शहरातील नाशिक महानगर परिवहन महामंडळामध्ये विविध पदांवर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. एकूण 13 जागांवर भरती प्रक्रिया होत आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 13 ऑक्टोबर आहे.
पदाचे नाव व पात्रता :
१) मुख्य कार्यकारी अधिकारी:
पात्रता : मास्टर ऑफ मॅनेजमेंट, 10 वर्ष अनुभव
२) मुख्य खाते आणि वित्त अधिकारी
पात्रता : CA अथवा ICWAची डीग्री आवश्यक
३) कंपनी सचिव
पात्रता : कंपनी सेक्रेटरीएटची परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक
४) व्यवस्थापक
पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण
५) प्रशासन अधिकारी
पात्रता : एमबीए एच आर शिक्षण आवश्यक
६) मुख्य कार्यकारी अधिकारी
पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीपर्यंतचं शिक्षण
७) एमडी जनसंपर्क अधिकारी:
पात्रता : कॉर्पोरेट कम्युनिकेशनमध्ये पदवी आवश्यक
८) लेखापाल:
पात्रता : वाणिज्य पदवी उत्तीर्ण
वयाची अट : २१ वर्षे ते ६२ वर्षापर्यंत.
मानधन :
मुख्य कार्यकारी अधिकारी – 1,50,000/- रुपये प्रतिमहिना
मुख्य खाते आणि वित्त अधिकारी – 50, 000/- रुपये प्रतिमहिना
कंपनी सचिव – 35, 000/- रुपये प्रतिमहिना
व्यवस्थापक – 40,000/- रुपये प्रतिमहिना
प्रशासन अधिकारी- 30,000/- रुपये प्रतिमहिना
मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी अधिकारी- 30,000/- रुपये प्रतिमहिना
एमडी, जनसंपर्क अधिकारी – 30,000/- रुपये प्रतिमहिना
लेखापाल (Accountant) – 20,000/- रुपये प्रतिमहिना
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा