उल्हासनगर महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे लवकरच तब्बल 274 जागांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 04 ऑक्टोबर ते 08 ऑक्टोबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
१. वैद्यकीय अधिकारी
२. स्टाफ नर्स
३. वॉर्ड बॉय
४. फार्मासिस्ट
५. लॅब टेक्निशियन
६. हॉस्पिटल प्रशासन
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
वैद्यकीय अधिकारी – संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.
स्टाफ नर्स – GNM किंवा ANM मध्ये शिक्षण आणि अनुभव आवश्यक.
वॉर्ड बॉय- दहावी उत्तीर्ण, स्किल इंडिया कामातून प्रशिक्षण आणि Covid सेवेचा अनुभव आवश्यक.
फार्मासिस्ट – फार्मसीमध्ये शिक्षण आणि कामाचा अनुभव आवश्यक.
लॅब टेक्निशियन – Bsc आणि संबंधित विषयांमध्ये -पदवी किंवा डिप्लोमा आवश्यक.
हॉस्पिटल प्रशासन – कोणत्याही मेडिकल शाखेतील पदवी, तसंच हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर डिप्लोमा आवश्यक.
इतका मिळणार पगार
वैद्यकीय अधिकारी – 1,50,000/- – 2,50,000/- रुपये प्रतिमहिना
स्टाफ नर्स – 35,000/- – 45,000/- रुपये प्रतिमहिना
वॉर्ड बॉय- 20,000/- रुपये प्रतिमहिना
फार्मासिस्ट – 30,000/- रुपये प्रतिमहिना
लॅब टेक्निशियन – 30,000/- रुपये प्रतिमहिना
हॉस्पिटल प्रशासन – 50,000/- रुपये प्रतिमहिना
मुलाखतीचा पत्ता : अग्निशमक विभाग, महापालिका मुख्यालयाच्या मागे, उल्हासनगर -३
जाहिरात : PDF