रावेर,(प्रतिनिधी)- तालुक्यातील विवरा खुर्द येथे शेतात वीज पडून शेतमजूर महिला जागीच ठार झाल्याची घटना आज दि.27 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.
सविस्तर असे की, विवरे खुर्द येथील शेतात हे आदिवासी शेतमजूर कुटुंब झोपडीत रहात होते. दुपारी पाऊस सुरु असतांना वीज पडली त्यात नूरकी वाघेला वय ३५, ही महिला जागीच ठार झाली.