जळगाव, (प्रतिनिधी)- शहरापासून जवळच असलेल्या बांभोरी पुलाजवळ ट्रकच्या चाकाखाली आईसह मुलगा दोघेही आल्याने त्यांचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.
एरंडोल येथील रहिवाशी चारुशीला राहुल पाटील या मुलगा निशांत व चारुशीला पाटील यांच्या बहीण रुपाली पाटील हे तिघे जण दुचाकीने एरंडोलहून जळगावला येत असतांना बांभोरी जवळ टँकरला ओव्हरटेक करताना तोल जाऊन ते चाका खाली आल्याने चारुशीला पाटील (वय ४०) व निशांत पाटील ( वय १२) हे जागीच ठार झाले.तर दुचाकी चालविणाऱ्या रुपाली पाटील या जखमी झाल्या आहेत.