पाचोरा ( प्रतिनिधी)—आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनतर्फे तालुक्यातिल तारखेडा येथिल डाॅ.बापु सोनवणे यांना यावर्षाचा आयुर्वेदातिल योगदानाबद्दल आयुष रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गेल्या २० वर्षापासुन पाचोरा तालुका व पंचक्रोशित समाजातिल तळागाळातिल रूग्णांना सेवा देतांना आयुर्वेदाचा उपयोग कसा करावा आणी वापर करण्यावर भर देणारे तालुक्यातिल तारखेडा येथिल डाॅ.बापु सोनवणे याचे योगदान अमुल्य आहे.त्यांनी करोना काळात तालुका व पंचक्रोशितिल रूग्णांच्या घरी जाउन सेवा केली.त्यांच्या आयुर्वेदातिल योगदानाची दखल घेत आज औरंगाबाद येथिल यशवंतराव नाट्यगृहात आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोशिएशनतर्फे यावर्षाचा आयुष रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी व्यासपिठावर आयुष इंटरनॅशनल मेडिकलचे अध्यक्ष नागपुर येथिल डॉ सतीश कराळे ,संस्थचे चेअरमन डॉ नितीन पाटील व वैद्यकिय क्षेञातिल अनेक मान्यवर उपस्थित होते.त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे तालुक्यात त्यांचे अभिनंदन होत आहे.