उस्मानाबाद, दि.27 – लोहारा तालुक्यातील वडगाव येथील कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधीकारी हणमंत दनाणे यांनी शनिवारी सकाळी नऊ ते दहाच्या सुमारास कार्यालयात कुणीच नसतांना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून यावेळी पोलिसांना एक सुसाईड नोट देखील मिळून आली असून यामधून धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी त्वरित गावातील दोन महिलांसह एका पुरुषाला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
हणमंत दणाने हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (सामाजिक न्याय) विभागाचे प्रदेश सरचिटणीस होते.कार्यालयातच गळफास घेत आत्महत्या केल्याने प्रचंड खळबळ उडाली होती.