महाराष्ट्र सरकार सार्वजनिक आरोग्य विभागातील ६२०० रिक्त पदांसाठी भरती करीत त्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा रद्द झाल्याने चांगलाच गोंधळ उडाला असतांना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या परीक्षा घेण्याबात माहिती दिली आहे.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, ‘आरोग्य विभागाच्या परीक्षेची तारीख अधिकृत जाहीर नसली तरी सुद्धा १५ ते १६ ऑक्टोबर किंवा २२ ते २३ ऑक्टोबर या तारखेला परीक्षा घेण्यात येण्याची शक्यता आहे. या संभाव्य तारखा असून दरम्यान शाळा सुद्धा सुरु होणार आहेत. त्यामुळे त्याचे नियोजन बघूनच आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या पुढील तारखा ठरवल्या जातील असं देखील
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.