चाळीसगाव प्रतिनिधी : जिल्ह्यात मागील काही दिवसापासून पाऊस सुरूच आहे. चाळीसगाव कन्नड घाट व परिसरात शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला. यामुळे कन्नड घाटामध्ये पुन्हा दरड कोसळली आहे. तर तितुर व डोंगरी नदीला मोठा पूर आला. दरम्यान, पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या कन्नड घाटामधून प्रवाशांनी प्रवास करू नये असे आवाहन केले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे कन्नड घाटात मोठ्या दरडी कोसळून रस्त्याचे नुकसान झालेले होते. त्यामुळे हा घाट दुरुस्तीसाठी काही दिवस बंद ठेवण्यात आलेला होता.
आठ दिवसांपूर्वी या घाटामधून दोन चाकी व चार चाकी हलकी वाहने यांना घाटातून प्रवास करण्यास मुभा देण्यात आली होती. अवजड वाहनांना अजूनही हा घाट प्रवासासाठी खुलासा करण्यात आलेला नव्हता. परंतु काल पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कन्नड घाटची पुन्हा दरड कोसळली आहे. हा रस्ता पुन्हा बंद झाल्याने पुन्हा प्रवाशांचे हाल होणार आहे. काल रात्री पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या घाटामधून प्रवाशांनी प्रवास करू नये असे आवाहन केले आहे.