अमळनेर – अमळनेर तालुक्यात नुकत्याच झालेल्या अति पावसामुळे अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकरी या ओल्या दुष्काळा मुळे पुरते चिंतेत पडलेले आहे,
सदर पाऊस मारवड, कळमसरे, पाडळसरे, धार, बोहरा,निम परीसरात झाल्यामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतातील उभे पिक खराब झाल्याने व शेतातील पिकामध्ये पाणी असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
यासाठी शेतकरी बांधवांना पिक विमा त्वरित मिळावा व ज्यांचा पंचनामा झाला नसेल तो त्वरित करावा यासाठी माजी आयपीएस अधिकारी साहेबराव पाटील व शेतकरी बांधवांनी तहसीलदार यांना निवेदन दिले.
अतिवृष्टी मुळे मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांचे नुकसान झाले आहे.147 मी.मी पावसामुळे शेतात 3 फुटापर्यंत पाणी जमा झाले आहे.हातातले पीक गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत त्यावर त्वरित अतिवृष्टीमुळे जे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे त्या संदर्भात लवकरात लवकर पंचनामे करून शेतकर्यांना नुकसान भरपाई त्वरीत मिळावी या संदर्भात तहसीलदारांना निवेदन
12 रोजी विमा अधिकारी, कृषी सहाय्यक अमळनेर यांच्याशी चर्चा करून मारवड मंडळातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे. त्या 3 ते साडे 3 हजार शेतकरी बांधव पिकविम्याच्या रकमेपासून वंचित आहेत त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी. त्याचप्रमाणे त्यांनी कळमसरे,पाडळसरे ह्या ठिकाणी काम सुरू केले,कळमसरे,
पाडळसरे,निम,बोहरा,मारवड,धार व मारवड मंडळातील गावांना भेटी देऊन माजी पोलीस आयुक्त साहेबराव पाटील यांनी स्वतः प्रांत साहेब व तहसीलदार यांच्याशी नुकसानभरपाई बद्दल चर्चा केली व तेथील शेतकर्यांसोबत चर्चा करून त्यांना मदतीचे आश्वासन दिले .
या प्रसंगी साहेबराव पाटील यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. मात्र उपस्थित जनसमुदाय पाहता व पाटील यांची वाढती लोकप्रियता विरोधकांची चांगलीच डोकेदुखी ठरणार, अशी चर्चा अमळनेर मध्ये दिसून येत आहे.