जळगाव ;- मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असलेल्या डॉ पायल तडवी या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केली आहे.या घटनेचा निषेध करण्यासाठी आज दि 30 रोजी दुपारी 4 वाजता जळगाव येथील शिवतीर्थ मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला .
मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असलेल्या डॉ पायल तडवी या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीला तीन वरिष्ठ विद्यार्थिनींकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून नायर रुग्णालयातील महाविद्यालयाच्या वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. डॉ पायल तडवी या मूळ जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असून नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत होत्या. वरिष्ठ महिला डॉक्टरांनी हिणवीत उच्चशिक्षित महिला डॉक्टरांनी असा प्रकार करून आत्महत्येस प्रवृत्त करण्याची घटना घडली आहे. या घटनेचा जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी व जळगांव महानगर काँग्रेसतर्फे जाहीर निषेध करण्यात आला . यावेळी मोर्चात जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील महानगर अध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी,प्रदेश सरचिटणीस शिरीष चौधरी,डीजी पाटील,डॉ. एजी भंगाळे , सुरेश पाटील,अजबराव पाटील,गणेश पाटील,भगतसिंग पाटील,विष्णू घोडेस्वार , अविनाश भालेराव,श्रीधर चौधरी आदी सहभागी झाले होते . यावेळी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले. आत्महत्येची सखोल चौकशी करण्यात येऊन डॉ. पाटील यांच्या नातेवाईंकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.