रावेर,(भागवत महाजन)- शैक्षिक आगाज ही आंतरराष्ट्रीय संस्था सामाजिक शैक्षाणिक पर्यावरण, वृक्ष संगोपन संवर्धन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सोशल मीडियाचा शिक्षणासाठी योग्य वापर असे विविध उपक्रम राबविणाऱ्या ऑनलाइन टीचिंग करणाऱ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय शैक्षणिक चर्चेत सहभाग घेणाऱ्या तसेच टाकाऊतून टिकाऊ अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील शिक्षकांना स्मार्ट टिचर या पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येत असते .
यात महाराष्ट्रातील शिक्षकांना ही स्मार्ट टीचर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यासाठी ऑनलाईन वेबसाईट द्वारे माहिती सादर करण्यात आली. तसेच महाराष्ट्राचे राज्य समन्वयक नाना शंकर पाटील भुसावळ यांच्याकडे whats app च्या माध्यमा तूनही माहीती मागविली साधारण एका जिल्हा भरातून 1 किवा 2 शिक्षकांची निवड शिक्षक यांना राष्ट्रीय स्वरूपाचा स्मार्ट टीचर पुरस्कार 2021 ऑनलाईनद्वारे या शैक्षिक आगाजचे मुख्य प्रवर्तक सीईओ श्री. अमीत चौधरी, श्री. हेमत उपाध्याय माजी डेप्युटी डायरेक्टर अजमेर राजस्थान, श्री. सुभाष राबरा डायरेक्टर ऑफ नवोदय विद्यालय समिती आणि असिस्टट कमिशनर,संस्थापक अध्यक्षा श्रीमती स्मृती चौधरी उत्तर प्रदेश , राज्य समन्वक महाराष्ट्र शैक्षिक आगाजचे श्री नाना पाटील भुसावळ आदि मान्यवरांनी रावेर तालुक्यातील शिक्षण विकास मंडळ संस्थेचे श्री. ग.गो.बेंडाळे हायस्कूल,विवरे या प्रशालेतील विविध पुरस्कार प्राप्त पदवीधर कलाशिक्षक अर्जुन जे. सोळुंके यांचा राष्ट्रीय स्वरूपाचा स्मार्ट टिचर पुरस्कार २०२१ साठी निवड केली.त्यांना गौरव पत्र , स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यापूर्वी सोळुंके यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार अकोला, समता परिषदेचा महात्मा जोतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार, क्रियाशील शिक्षक पुरस्कार,रावेर तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.सोळुंके जळगाव जिल्हा कलाध्यापक संघाचे विभागीय उपाध्यक्ष तसेच निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ रावेर तालुका कार्याध्यक्ष आहेत.
अर्जुन सोळुंके यांना राष्ट्रीय स्वरूपाचे स्मार्ट टिचर अवार्ड मिळाल्याबद्वल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.