मुंबई : Amazon च्या वार्षिक ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची घोषणा करण्यात आली आहे. विक्रीच्या तारखा अद्याप उघड झालेल्या नाहीत. अधिकृत टीझर सुचवतो की, ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल दरम्यान अॅमेझॉन स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, स्मार्टवॉच, ट्रू वायरलेस इअरबड्स आणि इतर सर्व इलेक्ट्रॉनिक्सवर मोठ्या प्रमाणात सूट देणार आहे. मात्र डील्स अद्याप उघड झालेल्या नाहीत.
अॅमेझॉन ग्रेट इंडियन सेल 2021 च्या तारखांची अद्याप पुष्टी होणे बाकी आहे, परंतु या तारखा ऑक्टोबरच्या सुरुवातीच्या आहेत, अशी माहिती मिळाली आहे. अॅमेझॉनने आगामी ग्रेट इंडियन सेल 2021 मध्ये सहभागी होणाऱ्या बँकांची पुष्टी केली आहे. एचडीएफसी बँकेने डेबिट आणि क्रेडिट कार्डसह अतिरिक्त 10 टक्के सूट देण्यासाठी Amazon सोबत भागीदारी केली आहे. जास्तीत जास्त बचत करण्यासाठी, Amazon पे ICICI बँक क्रेडिट कार्ड ऑफर आहे जी तुमच्या अमेझॉन पे बॅलेन्समध्ये 5% कॅशबॅक आणि 750 रुपये जॉइनिंग बोनस देईल.
बजाज फिनसर्व डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 1 लाख रुपयांपर्यंत क्रेडिट लिमिटपर्यंत नो कॉस्ट ईएमआय ऑफर करेल. याव्यतिरिक्त, ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलचा भाग म्हणून अमेझॉन 2500 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील देणार आहे.
ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल दरम्यान अॅमेझॉन विविध इलेक्ट्रॉनिक्स अॅक्सेसरीजवर 40 टक्के डिस्काऊंटसह उपलब्ध असेल. Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल 2021 मध्ये किंडल आणि फायर टीव्ही सारख्या अॅमेझॉन उत्पादनांची संपूर्ण श्रेणी अमेझॉन सेल दरम्यान विशेष लाँचसह उपलब्ध असेल. अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल दरम्यान स्मार्ट टीव्ही आणि इतर घरगुती उपकरणे आणि उत्पादने मोठ्या सवलतीसह उपलब्ध होतील.
सणासुदीच्या हंगामाच्या सुरूवातीस, Amazon नवा सेल आयोजित करत आहे. दसरा किंवा दिवाळीपूर्वी कंपनी येथे सेलचे आयोजन करू शकते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही काही महिन्यांपासून एखादी वस्तू खरेदी करायचं प्लॅनिंग करत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. या सेलदरम्यान, आपण मोठ्या प्रोडक्ट्सवर बंपर सवलत देखील मिळवू शकता.