बंगळुरू – विक्रम लँडरशी संपर्क साधण्याच्या इस्रोच्या प्रयत्नांना आता नासाकडून मदतीचा हात मिळत आहे. त्यामुळे नजिकच्या भविष्यात विक्रमशी संपर्क होऊ शकेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
इस्रोमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नासाच्या जेट प्रोपेल्शन लॅबोरेटरीमधूम विक्रमला संदेश पाठविले जात आहेत. अद्याप त्यांना विक्रमकडून प्रतिसाद मिळाला नसला तरी नजिकच्या भविष्यात तो प्रस्थापित होऊ शकेल अशी आशा व्यक्त आहे.
चांद्रयान 2 मोहिमेला बसलेला धक्का विसरून नव्या मोहिमेसाठी सज्ज व्हावे, असे आवाहन इस्रोचे प्रमुख के. शिवन यांनी केले होते. त्यामुळे विक्रमशी संपर्क होण्याच्या आशेबाबत साशंकता व्यक्त होत असतानाच नासाच्या मदतीमुळे या आशेला नवी पालवी फुटली आहे.