जळगाव,(प्रतिनिधी)- भारत सरकार रेल्वेचे खाजगीकरण करीत आहे त्याच्या विरोधात 17 जून रोजी एनएफआयआर व सीआरएमएस यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत सीआरएमएस जळगाव पाचोरा शाखेतर्फे जळगाव व पाचोरा मध्ये गेट मिटिंग करण्यात आली यावेळी रेल्वेच्या खाजगीकरणाला विरोध दर्शविण्यात आला.
यावेळी आरएमएस चे सचिव श्री गणेश कुमार सिंग म्हणाले की, रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या नावाखाली रेल्वेचे खाजगीकरण सुरू आहे रेल्वेचे खाजगीकरण होणे यासाठी आपण सर्वांनी मिळून त्याला विरोध दर्शविला पाहिजे रेल्वेत सुरू असलेले आऊटसोर्सिंग बंद झाले पाहिजे रेल्वेतील रिक्त पदे त्वरित भरावी ज्या मागण्या यावेळी करण्यात आल्या जळगाव येथील गेट मिटिंग मध्ये जळगाव स्थानकाचे स्टेशन मास्तर श्री अग्रवाल श्री ठाकूर शाखा पदाधिकारी रिटे श्रीवास्तव विनय सिंह बी एम पाटील पियुष महेश्वरी हेमराज मीना गणेश पाटील अविनाश कुमार वाल्मिक बोरसे योगेश चव्हाण गजानन पाटील चंद्रकांत सपकाळे आदी कर्मचारी उपस्थित होते.