झारखंड : झारखंच्या लातेहार जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. लातेहारच्या बालूमाथ येथे करमा विसर्जनासाठी गेलेल्या सात मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत मुलींचं वय 10 ते 20 वर्षांच्या दरम्यान असल्याचं सांगितलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच बालूमाथ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सध्या मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवले आहेत. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतांपैकी तीन मुली सख्ख्या बहिणी होत्या. मननडीह टोला येथील रहिवासी अकलू गंझू याच्या मुली होत्या. तर मृत सातही मुली शेरेगडा गावातील मननडीह टोला येथील रहिवासी होत्या.
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुली तोरी-बाळूमठ-शिवपूर रेल्वेमार्गाच्या बांधकामासाठी खोदलेल्या खोल खड्ड्यात कर्म दल विसर्जनासाठी गेल्या होत्या. या दरम्यान ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी दाखल झाले आणि मुलींना बाहेर काढले. मात्र 4 मुलींचा आधीच मृत्यू झाला होता.
मृत मुलींची नावं
रेखा कुमारी – 18 वर्ष
लक्ष्मी कुमारी- 8 वर्ष
रिना कुमारी- 11 वर्ष
मीना कुमारी- 8 वर्ष
पिंकी कुमारी- 15 वर्ष
सुषमा कुमारी- 7 वर्ष
सुनिता कुमारी- 17 वर्ष