Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव शहरातील ‘या’ नऊ रस्त्यांचे सा. बां. विभागाकडे वर्ग करण्यासाठी मनपाने तातडीने ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्याकरिता पालकमंत्र्यांनी दिले निर्देश

najarkaid live by najarkaid live
September 17, 2021
in जळगाव
0
जळगाव शहरातील ‘या’ नऊ रस्त्यांचे सा. बां. विभागाकडे वर्ग करण्यासाठी मनपाने तातडीने ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्याकरिता पालकमंत्र्यांनी दिले निर्देश
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव दिनांक 17 – जळगाव शहरातील महानगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या नऊ रस्त्यांवरील अतिक्रमण काढून सदरचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यासाठी तातडीने ना हरकत प्रमाणपत्र द्यावे. जेणेकरुन पुढील कार्यवाही करणे होईल असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिले.

जळगाव शहर महानगरपालिकेला प्रदान केलेल्या 61 कोटी रुपयांच्या कामांची सद्यस्थिती आणि उर्वरित कामांच्या नियोजनाबरोबरच शहरवासियांना चांगल्या सुविधा देण्याबाबत येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस महापौर जयश्रीताई महाजन, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, उपमहापौर कुलभूषण पाटील, अधिक्षक अभियंता रुपा गाजरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे चंद्रकांत सिन्हा, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री. चौधरी, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, नगरसेवक नितीन लढ्ढा, विषणू भंगाळे, शरद तायडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, नगरसेवक, जिप सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले की, शहरातून जाणाऱ्या महामार्गालगतच्या चौकांचे राष्ट्रीय महामार्ग विभागाने सुशोभीकरण करावे त्याचबरोबर इतर चौकांसाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिलेत. आजच्या बैठकीत शहरासह जळगाव तालुक्यातील विविध विकासकामांबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने जिल्हा वार्षिक योजनेतून महानगरपालिकेच्या दिलेल्या 61 कोटी रूपयांच्या विनियोगाबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. सध्या शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. शहरातील रस्ते तातडीने दुरुस्त करण्यासाठी महानगरपालिकेने नियोजन करण्याच्या सुचना त्यांनी दिल्यात.

हे आहेत ते प्रमुख नऊ रस्ते…

निमखेडी ते शिवाजीनगर, टॉवर चौक ते आसोदा रेल्वे गेट, शिवाजीनगर पूल ते के. सी. पार्क, भिलपुरा पोलीस चौकी ते ममुराबाद (मनपा हद्दीपर्यत) टॉवर चौक ते काव्य रत्नावली चौक, टॉवर चौक ते अजिंठा चौफुली, कोंबडी बाजार ते डीमार्ट (मोहाडी फाटा), मोहाडी फाटा ते लांडोरखोरी आणि काव्य रत्नावली चौक ते गिरणा पंपींग हे प्रमुख रस्ते महापालिकेने सार्वजनीक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यासाठी त्यावरीत अतिक्रमण काढून द्यावे तसेच त्याकरीता लागणारे ना हरकत प्रमाणपत्रही तातडीने देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाने आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक आणि अजिंठा चौफुली येथील चौकांचे सुशोभीकरण करावे तर बहिणाबाई चौक, रिंगरोड चौक, टॉवर चौक, स्वातंत्र्य चौक आणि अन्य चौकांच्या सुशोभिकरणासाठी महानगरपालिकेने प्रस्ताव तयार करावेत यासाठी नगरविकास विभागाकडून निधी मिळविणसाठी आपण प्रयत्न करु असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरु असलेल्या 440 कोटी रुपयांच्या तर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत सुरु असलेलया 35 कोटी रुपयांच्या कामांचा पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. यात आसोदा येथील उड्डाणपुल, प्रिंपाळा- भोईटेनगर पुल, म्हसावद येथील उड्डाणपुल, खेडी-भोकर पुल, मोहाडी येथील 100 खाटांचे रुग्णालय आदिंचा समावेश आहे. मोहाडी येथील अद्ययावत अशा 100 खाटांच्या महिला रूग्णालयातील उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करून हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने जनतेच्या आरोग्य सुविधांसाठी अर्पण करण्याच्याद्ष्टीने संबंधित विभागाने कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिलेत.

या बैठकीत जळगाव-ममुराबाद-विदगाव-धानोरा राज्यमार्ग, पाळधी-फुफनगरी-ममुराबाद-आसोदा-तरसोद-नशिराबाद-मन्यारखेडा-कुसुंबा-मोहाडी-सावखेडा-पाळधी हा रिंग रोड, नशिराबाद-सुनसगाव-कुर्‍हा-बोदवड (जिल्हा हद्द) या राज्य महामार्गाबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच तीर्थक्षेत्र विकास योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील विविध तीर्थक्षेत्रांचे विकासाचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देखील त्यांनी बैठकीत दिले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वयाच्या 20 वर्षांनंतर महिलांनी ‘हे’ 5 पदार्थ जरूर खावेत, कारण जाणून घ्या

Next Post

जळगाव शहरातील नऊ रस्ते सा.बां.वि.कडे वर्ग करण्यासाठी पालिकेने ना हरकत प्रमाणपत्र द्यावे ; ना.पाटील

Related Posts

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Next Post
जळगाव शहरातील नऊ रस्ते सा.बां.वि.कडे वर्ग करण्यासाठी पालिकेने ना हरकत प्रमाणपत्र द्यावे ; ना.पाटील

जळगाव शहरातील नऊ रस्ते सा.बां.वि.कडे वर्ग करण्यासाठी पालिकेने ना हरकत प्रमाणपत्र द्यावे ; ना.पाटील

ताज्या बातम्या

Horoscope Today – 1 जुलै 2025 राशी भविष्य मराठी

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

July 1, 2025
एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

July 1, 2025
खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us