अमळनेर – पंचवार्षिकमध्ये विकासकामांचे जे टार्गेट ठेवले होते त्याचा आलेख पूर्णत्वास येत असल्याचे समाधान आपल्याला असल्याची भावना आ.शिरीष चौधरी यानीं मतदार संघातील सावखेडे, ढेकूसीम, शिरसाळे, तरवाडे येथे विविध विकास कामांचे लोकार्पण भूमिपूजन प्रसंगी काढले.
सावखेडे येथे ग्रामपंचायत 10 लाख, शौचालय 5 लाख, काँक्रीटीकरण रस्ता 5 लाख आदी कामांचे लोकार्पण तसेच 10 लाख निधीतून काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन, ढेकू सिम, चारम अंबासन येथे प्रत्येकी सहा लाख निधीतून देवमढी, 7 लाख निधीतून व्यायाम शाळा इमारत, व रस्ता काँक्रीटीकरण, 12 लाख निधीतून ग्रामपंचायत इमारत या कामांचे भूमिपूजन,तर शिरसाळे येथे 20 लाख निधीतून रस्ता काँक्रीटीकरण , तरवाडे येथे कुलस्वामिनी धनदाई माता परिसरात7 10 लाख निधीतून सभा मंडप,व 5 लाख निधीतून काँक्रीट रस्ताचे भूमीपूजन करण्यात आले.
प्रत्येक गावात उत्साहात कार्यक्रम पार पडला.याप्रसंगी सावखेडे उपसरपंच धर्मेंद्र सोनवणे, ढेकूसीम सरपंच जाधवराव पाटील, शिरसाळे सरपंच युवराज पाटील, तरवाडे सरपंच रामकृष्ण पाटील, सुदरपट्टी सरपंच सुरेश पाटील, माजी सरपंच सुदाम चौधरी, सावखेडे माजी सरपंच राजेंद्र पाटील, आर्डी उपसरपंच किशोर पाटील, शिरसाळे उपसरपंच कैलास महाले, उमेश पाटील, किरण गोसावी, आबु महाजन, योगेश पाटील, प्रशांत पाटील, विपीन सोनवणे, ताराबाई शिरसाठ, बापू अहिरे,रेखा कदम, छोटू सोनवणे,जिजाबराव महाले, जगतराव पाटील, आबा चौधरी, देविदास चौधरी, अल्लाउद्दीन मिस्त्री,रवी पाटील, भगवान पाटील, चंद्रकांत पाटील, शांताराम पाटील, शार्दूल पवार, रवींद्र ठाकरे, संजय पाटील,मगन सोनवणे,राजू महाले, सोमा वैद्य, भुरा भोई,प्रकाश सोनवणे,संजय कदम,धनराज बाविस्कर, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.