भारतीय उत्तर रेल्वेमध्ये दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी मोठी पदभरती होणार आहे. तब्बल 3093 जागांसाठी ही भरती असणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अप्रेन्टिस या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 असणार आहे.
एकूण जागा : 3093
या पदांसाठी भरती
१) अप्रेन्टिस (Apprentice) –
पात्रता आणि अनुभव : अप्रेन्टिस (Apprentice) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांकडे संबंधित ट्रेडमध्ये ITI सर्टिफिकेशन असणं आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2021
भरतीबाबतची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा