जळगाव – येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या नाक-कान-घसा विभागामार्फत घेण्यात आलेल्या शिबीरांतर्गत ५० रूग्णांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या. या सर्व शस्त्रक्रिया तज्ञांच्या टीमने यशस्वी केल्या.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे नाक-कान-घसा यांच्याशी संबंधीत आजारांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी मोफत शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीरात कानाचा पडदा बदलविणे, कानाचे सडलेले हाड काढणे, नासुर, नाकातील कोंब काढणे, थॉयराइडच्या गाठी काढणे, टॉन्सील, नाकातील वाढलेले हाड काढणे, मानेतील गाठी काढणे यासारख्या आजारांच्या तपासणी व शस्त्रक्रियांचा समावेश होता. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात या आजाराचे ५० हून अधिक रूग्ण दाखल झाले होते. शिबीरात आलेल्या पहिल्या टप्प्यात ५० रूग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच शस्त्रक्रियेसाठी नाक-कान-घसा तज्ञ डॉ. अनुश्री अग्रवाल, डॉ. विक्रांत वझे, डॉ. पंकजा बेंडाळे यांनी या शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केल्या. तपासणीसह शस्त्रक्रिया देखिल अगदी मोफत करण्यात आली. शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णांना जेवणही मोफत देण्यात आले. शस्त्रक्रियांसाठी भूलतज्ञांच्या टिमने देखिल सहकार्य केले.
एक रूपयाही खर्च न होता झाला उपचार – चित्राबाई परदेशी
कानाच्या पडद्याचे दुखणे मोठे असह्य होते. दिवसेंदिवस हा त्रास वाढतच होता. स्थानिक ठिकाणी डॉक्टरांना दाखविले. मात्र त्यांनी शस्त्रक्रियेसाठी खर्च लागणार असल्याचे सांगितले. पेपरमध्ये डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील शिबीराची माहिती मिळाल्यानंतर याठिकाणी उपचारासाठी दाखल झाली. त्यानंतर सगळ्या तज्ञ डॉक्टरांनी कानाच्या पडद्याची शस्त्रक्रिया एक रूपयाही न घेता संपुर्णपणे मोफत केल्याची माहिती चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथील चित्राबाई परदेशी यांनी दिली.