मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाचे दर सातत्याने वाढत असल्याने भारतामध्येही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, तरीही भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी सलग 11 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. जळगावात एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.५२ रुपये आहे तर डिझेलचा भाव ९५.९४ रुपये इतका आहे.
मध्यंतरी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत किंचित कपात झाली होती. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण, गेल्या दहा दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जैसे थे आहेत. त्यामुळे इंधन दरात कपात होऊन महागाईपासून दिलासा मिळेल, या सामान्यांच्या आशा तुर्तास धुळीला मिळाल्या आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाचे दर सातत्याने वाढत असल्याने भारतामध्येही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, तरीही भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी सलग 11व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत.
गेल्या दहा दिवसांपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 107.26 रुपये तर एका लीटल डिझेलसाठी 96.19 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत प्रतिलीटर पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 101.19 आणि 88.62 रुपये इतका आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील.
दररोज 6 वाजता बदलतात किमती
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.