नवी दिल्ली: मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेंतर्गत सरकार छोट्या शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये देते. मात्र, तुम्ही अजूनही या योजनेचा लाभ घेतला नसेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि फायद्याची बातमी. जे शेतकरी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेत नाहीत, त्यांना 4000 रुपये मिळण्याची मोठी संधी आहे. यासाठी तुम्हाला ३० सप्टेंबर पर्यंत किसान सन्मान योजनेसाठी रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला ४ हजार रुपये मिळू शकतात.
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या हप्त्यात म्हणजेच ऑगस्ट-नोव्हेंबरमध्ये 10.27 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांची रक्कम पोहोचली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 12.14 कोटी शेतकरी कुटुंबे जोडली गेली आहेत. त्याचबरोबर 30 नोव्हेंबरपर्यंत उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचतील. आता सरकार येत्या काही दिवसांमध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत मिळालेली रक्कम दुप्पट करू शकते.
शेतकऱ्यांना 4000 रुपये मिळतील
ज्या पात्र शेतकऱ्यांनी अद्याप पीएम किसान सन्मान निधी योजनेत स्वतःची नोंदणी केली नाही, त्यांनी जर 30 सप्टेंबरपूर्वी पीएम किसानमध्ये नोंदणी केली तर त्यांना 4000 रुपये मिळतील. कारण आता तुम्हाला सलग 2 हप्ते म्हणजे 4000 रुपये मिळण्याची संधी आहे. या अंतर्गत, जर तुमचा अर्ज स्वीकारला गेला तर तुम्हाला ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये 2000 रुपये मिळतील. यानंतर, डिसेंबर महिन्यात तुमच्या बँक खात्यात 2000 रुपयांचा हप्ता येईल.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
1. तुमच्यासाठी बँक खाते क्रमांक असणे अनिवार्य आहे कारण सरकार DBT द्वारे शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित करते.
2. तुमचे बँक खाते आधारशी जोडलेले असणे आवश्यक आहे.
3. तुमच्यासाठी आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. याशिवाय तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.
4. पीएम किसानच्या वेबसाइट pmkisan.gov.in वर तुमची कागदपत्रे अपलोड करा.
5. आधार लिंक करण्यासाठी, तुम्ही फार्मर कॉर्नरच्या पर्यायावर जा आणि एडिट डिटेलच्या पर्यायावर क्लिक करून अपडेट करा.
शेतकऱ्यांना 9 हप्ते मिळाले आहेत
सरकारने पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत 9 हप्ते जारी केले आहेत. पहिला हप्ता म्हणून, जिथे 2000 रुपयांची रक्कम 3,16,06,630 शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचली, आतापर्यंत 9 व्या हप्त्यात 9,90,95,145 शेतकऱ्यांना पैसे पाठवण्यात आले आहेत. सध्या 30 नोव्हेंबर पर्यंत 9 व्या हप्त्याचे पैसे उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातील. पीएम किसान योजना 2018 मध्ये सुरू करण्यात आली होती, ज्याचे उद्दिष्ट 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आहे.
पीएम किसान योजना ही एक जबरदस्त योजना आहे
या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकरी कुटुंबांना त्यांच्या बँक खात्यात वार्षिक 6000 रुपये हस्तांतरित केले जातात. ही रक्कम 2000-2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये हस्तांतरित केली जाते. या योजनेअंतर्गत 1.38 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे मानधन शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहे.