जळगाव, (प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून खर्डा किल्ल्यावर देशातील सर्वांत उंच ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या स्वराज्य ध्वज यात्रेचे आज श्री संत आदिशक्ती मुक्ताई अंतर्धान स्थळ कोथळी येथे रोहिणी खडसे यांनी उत्साहात स्वागत करत ‘स्वराज्य ध्वजाचे पूजन केले.यावेळी सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैया पाटील, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वराज्य ध्वज ७४ मीटर उंचीचा
९६ x ६४ फुटांचा असून ९० किलो वजन असलेला भारतातील सर्वात उंच “स्वराज ध्वज”आहे.