बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आज तीव्र झाले (WML).येत्या 24 तासात ते आणखी तीव्र (Depression) होण्याची शक्यता IMD ने वर्तवली,तसेच ते आतल्या दिशेने सरकण्याची शक्यता.परीणामी पश्र्चिम किनारपट्टीवर पुढचे ३,४दिवस वारे जोरदार असतील,राज्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता.
आयएमडीने रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, ठाणे, वर्धा, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पुढील तीन ते चार दिवस मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र पावसाचा जोर राहणार असल्याचे हवामान खात्यानं वर्तविले आहे.
पुढील काही दिवसांमध्ये बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र दाबामध्ये बदलून उत्तर-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता असल्याने आजपासून मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, कोकणात आणखीन मुसळधार पावसाची शक्यता आहे.