आजच्या युगात, जर उत्पन्न खूपच कमी असेल, तर भविष्यातील आर्थिक नियोजन करण्यापासून दूर राहून घरगुती खर्च चालवणे सोपे होते. आर्थिक दृष्ट्या कमकूवत असलेल्या लोकांसाठी म्हातारपणात पैसे जमवणं कठीण होतं. त्यामुळे केंद्र सरकारने अनेक पेंशन योजना सुरू केल्या आहे. ज्यांचा लाभ घेऊन आपले भविष्य सुखकर बनवता येऊ शकते.
पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना (PM SYM) ही पेंशन स्किम असंघटीत श्रेत्रातील लोकांसाठी आहे. ज्यांना 36 हजार रुपये पेंशन दिली जाणार आहे. या स्किम अंतर्गत 18 ते 40 वर्ष वयाचे लाभ घेऊ शकतात. या योजनेत प्रीमियमची रक्कम वयानुसार निर्धारित केली जाते. वर्षाला 36 हजार रुपयांची पेंशन महिन्याला 3000 रुपये प्रमाणे दिली जाते. श्रम आणि रोजगार मंत्रालयानुसार 10 सप्टेंबर 2021 पर्यंत सुमारे 45.11 लाख लोक या योजेनचा लाभ घेत आहे.
55 रुपयापासून सुरू होणारे मासिक योगदान
या योजनेत सहभागी होण्यासाठी किमान वय 18 वर्षे आहे. तुम्ही या वयात सामील झाल्यास, तुम्हाला प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेमध्ये वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत दरमहा 55 रुपये जमा करावे लागतील. म्हणजेच, तुम्हाला दररोज 2 रुपयांपेक्षा कमी बचत करावी लागेल. वयाच्या ६० वर्षांनंतर तुमच्या खात्यात आयुष्यभर 3000 रुपये पेन्शन येत राहील. तुमचे वय वाढेल तसे तुमचे योगदान थोडे वाढेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही वयाच्या 29 व्या वर्षी सामील झालात तर योगदान 100 रुपये असेल. तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी सामील झाल्यास, योगदान दरमहा 200 रुपये असेल.
नोंदणी प्रक्रिया
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेमध्ये नोंदणी कोणत्याही जवळच्या सीएससी केंद्रात करता येते. तुमच्याकडे आधार कार्ड आणि बचत खाते/जन धन खाते (IFSC कोडसह) असणे आवश्यक आहे. तसेच तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यावा लागेल. पासबुक, चेकबुक किंवा बँक स्टेटमेंट पुरावा म्हणून दाखवता येईल. खाते उघडण्याच्या वेळी ऑन-नॉमिनीलाही प्रवेश दिला जाऊ शकतो. एकदा संगणकात तुमचा तपशील टाकला की तुमचे मासिक योगदान निश्चित केले जाईल. तुमचे सुरुवातीचे योगदान रोख स्वरूपात द्यावे लागेल. त्यानंतर तुमचे खाते उघडले जाईल आणि श्रम योगी कार्ड उपलब्ध होईल. या योजनेची माहिती 1800 267 6888 टोल फ्री क्रमांकावर मिळू शकते.