नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेबाबत चिंता वाढत आहे. गेल्या 24 तासात नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 6 हजारांनी वाढ झाली आहे.
24 तासात दिवसात देशात 43 हजार 263 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 338 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट होत असताना गेल्या दोन दिवसांत अचानक 12 हजारांनी वाढ झाल्याचं दिसत आहे.
गेल्या 24 तासात भारतात दिवसात देशात 40 हजार 567 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 31 लाख 39 हजार 981 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 23 लाख 4 हजार 618 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 41 हजार 749 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 93 हजार 614 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.