मुंबई : यूएईत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा अखेर आज करण्यात आली आहे. भारतीय संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे कायम आहे.
विश्वचषकासाठी होणाऱ्या भारतीय संघाच्या घोषणेची सर्वांनाच उत्सुकता होती. कारण भारताकडे आता भरपूर खेळाडू असून त्यांच्यापैकी कोणत्या खेळाडूला नेमकी संधी मिळणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. आज अखेर भारतीय संघाची घोषणा झाली. विश्वचषकासाठी निवडलेला भारताचा हा समतोल संघ असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण भारतीय संघात चांगले फलंदाज तर आहेतच, पण त्याचबरोबर दर्जेदार अष्टपैलू खेळाडूही आहेत. त्याचबरोबर संघात वेगवान गोलंदाजांबरोबर फिरकीपटूंचेही चांगले पर्याय पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता हा संघ विश्वचषकात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
भारतीय संघ – विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी
टी-२० वर्ल्डकपमधील भारताच्या लढती
२४ ऑक्टोबर- पाकिस्तानविरुद्ध
३१ ऑक्टोबर- न्यूझीलंडविरुद्ध
०३ नोव्हेंबर- अफगाणिस्तानविरुद्ध
०५ नोव्हेंबर- पात्रता संघाविरुद्ध
०६ नोव्हेंबर- पात्रता संघाविरुद्ध.