जळगाव, दि. 29 – राज्यातील दुष्काळी परिस्थिती विचारात घेता सर्व ग्रामसेवकांसह ग्रामस्तरावरील अधिकारी गावात उपस्थित राहतील याची दक्षता घेण्याचे निदेश राज्य मंत्रीमंडळाच्या 28 मे रोजीच्या बैठकीत देण्यात आले आहे.
ग्रामसेवकांसह गावपातळीवरील संबंधित अधिकारी गावात उपस्थित न राहिल्यास त्यांचेवर कारवाई करावी. ग्रामसेवक व संबंधित अधिकारी गावांमध्ये उपस्थित राहतात अथवा नाही, याची खात्री करणारी यंत्रणा (Tracking System) तयार करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. याबाबतच्या कार्यवाहीचा अहवाल महाराष्ट्र ई समिक्षा प्रणालीवर सादर करण्याच्या सुचना संबंधित यंत्रणेस मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी दिल्या आहेत.