मुंबई : मागील काही दिवसापासून राज्यात धो-धो पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहू लागले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यातच आता हवामान विभागाने राज्यातील ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. तर एका जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे. तर जळगाव जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून यामुळे अनेक ठिकाणी नदी, नाले ओसंडून वाहत आहे. मुसळधार पावसाने जिल्ह्यातील अनेक धरणातून पाणी सोडले जात आहे. जिल्ह्यात आज देखील हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात एकट्या पालघरला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?
जळगाव
औरंगाबाद
जालना
बुलडाणा
अकोला
कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट?
नंदूरबार
धुळे
नाशिक
ठाणे
पुणे
सातारा
रायगड
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
अर्ध्या महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता नाही!
राज्यात गेले आठवडाभर तुफान पाऊस पडतोय. राज्यातल्या सर्वच जिल्ह्यांत सर्वदूर पाऊस पडतोय. मात्र आजपासून पावसाची तीव्रता कमी होतीय. त्यामुळे आज अर्ध्या महाराष्ट्रात पावसाची कोणतीही शक्यता नाहीय.