मुंबई : अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचं आज सकाळी मुंबईत निधन झाले. त्या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या.अक्षयने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना ही बातमी दिली.
इन्स्टाग्रामवर अक्षय कुमारची भावूक पोस्ट
ती माझं सर्वस्व होती आणि आज मला असह्य दुःख होत आहे. माझी आई अरुणा भाटिया यांनी आज सकाळी जगाचा निरोप घेतला आणि दुसऱ्या जगात तिची वडिलांशी पुनर्भेट झाली. मी आणि माझे कुटुंब कठीण काळात असताना तुम्ही केलेल्या प्रार्थनांचा मी आदर करतो. ओम शांती, अशा शब्दात अक्षयने आपल्या दुःखाला वाट मोकळी करुन दिली आहे.
पाहा अक्षयची इन्स्टाग्राम पोस्ट
अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून आपल्या आईसाठी चाहत्यांना दुवा करा, असं म्हटलं होतं. माझ्या आईच्या तब्येतीबद्दल विचारल्याबद्दल सर्वांचे आभार. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हा कठीण काळ आहे. प्रत्येक तास माझ्यासाठी कठीण आहे. तुमच्या सर्वांची प्रार्थना माझ्यासाठी महत्त्वाची आहे, असं अक्षय कुमारने आईच्या आजारपणादरम्यान म्हटलं होतं.