Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऑनलाईन सुविधांचा गैरवापर करत लर्निंग लायसन्स प्रक्रियेत गैरप्रकार आढळल्यास होणार ‘ही’ कारवाई

दोषी अर्जदार अनुज्ञप्तीसाठी कायमस्वरुपी अपात्र ठरणार

najarkaid by najarkaid
September 7, 2021
in राज्य
0
ऑनलाईन सुविधांचा गैरवापर करत लर्निंग लायसन्स प्रक्रियेत गैरप्रकार आढळल्यास होणार ‘ही’ कारवाई
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, दि. ७ : नागरिकांच्या सोयीसाठी तसेच कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी व शिकाऊ अनुज्ञप्ती परवाना ऑनलाईन पद्धतीने जारी करण्याची प्रणाली दिनांक १४ जून २०२१ पासून सुरु करण्यात आली आहे. शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी अर्ज करताना उमेदवारास केंद्र शासनाने विहीत केलेली परीक्षा देणे अनिवार्य असून या ऑनलाईन सुविधांचा गैरवापर करुन अनुज्ञप्ती मिळवणाऱ्या अर्जदार, संबंधित मध्यस्थ, अनधिकृत व्यक्ती यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात येणार आहे. तशा सूचना देखील संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

या कार्यप्रणालीमध्ये राज्यातील काही ठिकाणी शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी ही उमेदवाराऐवजी इतर अनधिकृत व्यक्ती देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ही कारवाई केली जाणार आहे.

केंद्रीय मोटार वाहन नियम ११ अन्वये, शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी अर्ज करताना उमेदवारास केंद्र शासनाने विहीत केलेली परीक्षा देणे अनिवार्य आहे. या प्रणालीचा वापर करतेवेळी पालकांनी त्यांच्या पाल्यास परीक्षेचे महत्त्व पटवून द्यावे तसेच प्रणालीचा गैरवापर होणार नाही याची जाणीव करुन देणे आवश्यक आहे. या लोकाभिमुख सोयीसुविधांचा गैरवापर होणार नाही यासाठी प्रणालीमध्ये आवश्यक त्या सुधारणा यथास्थिती करण्यात येत आहेत. तथापि, सध्या उपलब्ध असलेल्या या ऑनलाईन सुविधांचा गैरवापर करणा-या अर्जदार, संबंधित मध्यस्थ, अनधिकृत व्यक्ती यांच्यावर आवश्यक ती पोलीस कारवाई करण्याच्या सूचना संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. तसेच या प्रकरणी दोषी ठरलेला अर्जदार हा मोटार वाहन कायदा, कलम १९ (इ) अन्वये अनुज्ञप्ती धारण करण्यास कायमस्वरुपी अपात्र ठरेल अशी कारवाई करण्याच्या सूचना संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देण्यात येत आहेत, असेही या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

त्याचबरोबर जी महा ई-सेवा केंद्र, मोटार ड्रायव्हिंग स्कूल व इंटरनेट कॅफे या सुविधेचा गैरवापर करतील अशा संस्थांविरुध्द पोलीस कारवाई केली जाईल. तसेच महा ई-सेवा केंद्राबाबत जिल्हाधिकारी, मोटार ड्रायव्हिंग स्कूलबाबत संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी व इंटरनेट कॅफेविरुध्द पोलीस विभाग (सायबर सेल) यांना आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. असे गैरप्रकार निदर्शनास आल्यास त्याबाबत स्थानिक प्रादेशिक व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

या प्रणालीमध्ये नागरिकांना वापर करतांना आधारकार्ड क्रमांक व त्यावरील माहिती, फोटोग्राफ हे सारथी प्रणालीवर चुकीच्या पद्धतीने प्रदर्शित होत असल्यास अथवा त्या प्रदर्शित होत नसल्यास इत्यादी बाबी या राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC), दिल्ली व पुणे यांच्याशी समन्वय साधुन त्यामध्ये सुधारणा करण्यात येत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ब्रेकिंग ; सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर !

Next Post

कांताईंच्या स्मृतीदिनी भवरलाल जैन यांच्या प्रेरणादायी विचारांच्या फलकाचे भूमिपुत्राकडून अनावरण

Related Posts

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Next Post
कांताईंच्या स्मृतीदिनी भवरलाल जैन यांच्या  प्रेरणादायी  विचारांच्या  फलकाचे भूमिपुत्राकडून अनावरण

कांताईंच्या स्मृतीदिनी भवरलाल जैन यांच्या प्रेरणादायी विचारांच्या फलकाचे भूमिपुत्राकडून अनावरण

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us