Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अतिवृष्टीग्रस्त गावांत रोगराई पसरु नये म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले निर्देश

najarkaid live by najarkaid live
September 6, 2021
in जळगाव
0
अतिवृष्टीग्रस्त गावांत रोगराई पसरु नये म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले निर्देश
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) दि. 6 – चाळीसगाव शहरासह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीग्रस्त गावात रोगराई पसरु नये याकरीता ग्रामविकास विकास, पशुसंवर्धन व आरोग्य विभागाने एकमेकांमध्ये समन्वय राखून आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिलेत.

चाळीसगाव शहरासह तालुक्यात 31 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार मंगेश चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, पशुसंवर्धन उपायुक्त श्यामकांत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डिगंबर लोखंडे, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी रविंद्र लांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह रावळ यांचेसह ग्रामीण पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम, वीज वितरण, लघुपाटबंधारे, शिक्षण, राज्य परिवहन, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आदि विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, अतिवृष्टीग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात पशुहानी झाली आहे. त्यामुळे या भागात दुर्गधीमुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरीता सर्व संबंधीत विभगांनी तातडने पावले उचलून आवश्यक ती कार्यवाही करावी. कृषि विभागाने शेतीचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करावे. पंचनामे करण्यासाठी इतर तालुक्यातील मनुष्यबळाचा वापर करावा. बेघरांसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवाऱ्यांमधील नागरीकांना आवश्यक त्या सोईसुविधा नगरपालिकेने पुरवाव्यात. आरोग्य विभागामार्फत या भागात आरोग्य शिबिर घेऊन नागरीकांची तपासणी करावी तसेच लसीकरण शिबिर घ्यावे तर पशुसंवर्धन विभागाने या भागातील जनावरांची आरोग्य तपासणी करुन त्यांचेसाठीही लसीकरण शिबिराचे आयोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिलेत.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवा – आमदार मंगेश चव्हाण
अतिवृष्टी झालेल्या भागातील पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन तसेच पाणीपुरवठा योजना नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे या भागातील नागरीकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. गावातील विहिरीमध्ये पुराचे पाणी गेल्याने ते पाणी पिण्यासाठी उपयुक्त नसल्याने त्यांना तातडीने पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करण्याची सुचना आमदार मंगेश चव्हाण यांनी केली. पशुसंवर्धन विभागाने मृत रोगराई पसरु नये याकरीता जनावरांची विल्हेवाट लावावी, जनावरांचा मृत्यु दाखला तातडीने उपलब्ध करुन द्यावा, नदी किनाऱ्याचा भाग शोधून मृत जनावरे आढळल्यास त्यांची विल्हेवाट लावावी.

तसेच शाळा, आंगणवाड्या, पाणीपुरवठा योजना, रस्ते, विद्युत तारांची तातडीने दुरुस्ती होण्यासाठी आवश्यक ते प्रस्ताव तयार करण्याच्याही सुचना केल्यात. रस्त्यांच्या नुकसानीमुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे याकरीता रस्त्यांच्या दुरुस्तीस प्राधान्य द्यावे. त्याचबरोबर ज्या नागरीकांची पुरात कागदपत्रे वाहून गेली असेल त्यांचेसाठी शिबिर लावून त्यांना आवश्यक ती कागदपत्रांसाठी शिबिर घेण्यात यावे. ज्या गावातील एसटी सेवा बंद असेल ती सुरु करण्याच्याही सुचना त्यांनी बैठकीत दिल्यात. तसेच पुरामुळे नदी, नाल्यातील मोऱ्यांना अडकलेला कचरा सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरीत काढून घेण्याचीही सुचना त्यांनी केली.या बैठकीत सर्व संबंधित विभागांनी आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा तसेच पुढील काळात करण्यात येणार असलेल्या कामांची माहिती दिली.
00000


Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केरळमध्ये निपाह विषाणूने वाढवलं टेन्शन ; इतर राज्यांनाही सतर्कतेचा इशारा

Next Post

राज्यभरातील असंघटित कामगारांसाठी महत्वाची बातमी….

Related Posts

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Next Post
राज्यभरातील असंघटित कामगारांसाठी महत्वाची बातमी….

राज्यभरातील असंघटित कामगारांसाठी महत्वाची बातमी....

ताज्या बातम्या

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

July 1, 2025
खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

June 30, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
Load More
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

आता रेल्वे आरक्षणाचा Final Chart होणार 8 तास आधी तयार होणार

July 1, 2025
त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

July 1, 2025
खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

June 30, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us