मुंबई,(प्रतिनिधी)- विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या ओविंचे आठण करून देत मासू विद्यार्थी संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शाळा, महाविद्यालय सुरु करणे किती महत्वाचे आहे हे सांगत प्रस्ताव दिला आहे.तर या ओवी मधला शूद्र चा अर्थ आम्ही आजचा तरुण असा घेत असल्याचं देखील स्पष्ट केले आहे. अविद्या काय अनर्थ घडवू शकते हे इतिहासाने दाखवून दिले असल्याचं देखील मासू ने आपल्या प्रस्तावात मांडलं आहे.
राज्यांतील शाळा व महाविद्यालय त्वरीत सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) ने प्रस्ताव सादर केला असून महाविद्यालय, शाळा सुरु न झाल्यास मासू लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरणार असल्याचे कळविले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या रुग्ण संख्येत ही घट झालेली दिसुन येत आहे. परिस्थिती आता पूर्वपदावर असल्यामुळे शाळा व महाविद्यालयांना कोरोना चे सर्व नियम पाळुन महाराष्ट्र शासनाने लवकरांच लवकर यावर उपाय काढुन शाळा व महाविद्यालय त्वरीत सुरु करावीत.अन्यथा महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन लोकशाही मार्गाने सरकार विरोधात न्यायासाठी बंड पुकारुन रस्त्यावर उतरणार असल्याचं सांगण्यात आले आहे.याकरिता शाळा व महाविद्यालय त्वरीत सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्री यांना मासूने केला प्रस्ताव सादर केला आहे.