विविध आजारांवर उपचारांकरिता वापरल्या जाणाऱ्या ३९ प्रकारच्या औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अनेकदा सर्वसामान्य नागरिकांना महागडी औषधी घेण्यास अडचणी येतं असतात. अशात आता कोरोना काळ यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडल्या गेले आहेच अशात केंद्र सरकारनं सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे ३९ प्रकारची औषधं स्वस्त होणार आहेत. केंद्र सरकारनं या ३९ प्रकारच्या औषधांचा समावेश अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीत देखील केला आहे. यात कोरोना तसेच कॅन्सर (Cancer), डायबेटिस (Diabetes) आणि टीबीवर (TB) उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या महत्वाच्या औषधांचा समावेश आहे.