नवी दिल्ली : देशभरात आज गुरुवारी पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर आहेत. शुक्रवार, 3 सप्टेंबर रोजी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. ज्यात इंधनाच्या किंमतीत कोणताही बदल नाही. सप्टेंबरच्या पहिल्या तारखेलाच इंधन दरात कपात करण्यात आली. त्यात पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी 15 पैशांनी स्वस्त झाले होते. दरम्यान, आज जळगावात एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.६७ रुपये आहे तर डिझेलचा भाव ९६.१० रुपये इतका आहे.
अनेक शहरांमध्ये किंमत 100 रुपयांच्या पुढे गेली आहे
देशभरातील सुमारे 19 राज्यांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू -काश्मीर आणि लडाख यांचा या यादीत समावेश आहे. याशिवाय मुंबई, हैदराबाद आणि बेंगळुरू या महानगरांमध्ये पेट्रोलने आधीच 100 रुपये प्रति लिटरचा टप्पा ओलांडला आहे.
पेट्रोल डिझेलची किंमत (3 सप्टेंबर 2021 रोजी पेट्रोल-डिझेलची किंमत)
>> दिल्ली पेट्रोल 101.34 रुपये आणि डिझेल 88.77 रुपये प्रति लीटर
>> मुंबई पेट्रोल 107.39 रुपये आणि डिझेल 96.33 रुपये प्रति लीटर
>> चेन्नई पेट्रोल 99.08 रुपये आणि डिझेल 93.38 रुपये प्रति लीटर
>> कोलकाता पेट्रोल 101.72 रुपये आणि डिझेल 91.84 रुपये प्रति लीटर
>> नोएडा पेट्रोल 98.65 रुपये आणि डिझेल 89.34 रुपये प्रति लीटर
>> जयपूर पेट्रोल 108.27 रुपये आणि डिझेल 97.91 रुपये प्रति लीटर
>> भोपाळ पेट्रोल 109.77 रुपये आणि डिझेल 97.57 रुपये प्रति लीटर
दररोज 6 वाजता बदलतात किमती
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.