जळगाव, (प्रतिनिधी) – महसूल विभागाकडील पिक कापणी प्रयोगाचे काम नाकारण्याबाबत जामनेर तलाठी संघाने तहसीलदार यांना दिनांक 2 सप्टेंबर रोजी निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की,महसूल विभागाकडील पिक कापणी प्रयोग टीआरए कार्ड, पर्जन्यमान नोंद, पी. एम. किसान योजना, कृषी गणना, पिक नुकसान अनुदान ही कामे मूळची कृषी विभागाकडील असून ती विनाकारण आम्हावर लादण्यात आली आहे. त्यामुळे नव्याने देण्यात आलेली कामे करणे शक्य होतं नाही तरी जामनेर तालुक्यातील महसूल विभागाकडील सर्व पिक कापणी प्रयोगाचे तक्ते नम्रपणे नाकारून तक्ते परत करत असून संघटनेच्या निर्णयानुसार कामकाजावर बहिष्कार टाकत आहोत असं ही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.