नवी दिल्ली । कमकुवत जागतिक संकेत आणि रुपयाच्या मजबुतीमुळे आज सलग चौथ्या दिवशी भारतीय बाजारात सोन्याचे भाव घसरलेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) ने 2 सप्टेंबर रोजी सोन्याच्या दरात घट नोंदवली आहे. आज सोने किरकोळ घसरणीसह 47,065 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. चांदीचे दरही खाली आले आहेत. यापूर्वी काल सोन्याचे भाव 0.06 टक्क्यांनी घसरले आणि 47,090 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. सप्टेंबर फ्युचर्समध्ये चांदी 60 रुपयांनी घसरून 63,633 रुपये प्रति किलो झाली.
आपल्या शहराचे दर जाणून घ्या
आज जळगावात 22 कॅरेट सोन्याची किंमत 45,480 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,380 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,450 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चेन्नईमध्ये तुम्हाला 22 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमसाठी 44,560 रुपये खर्च करावे लागतील.
बंगलोरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 44,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
लखनऊमध्ये सोन्याची किंमत 22 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमसाठी 46,450 रुपये आहे.
पाटण्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 45,590 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.