मुंबई : सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. आज घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 15 दिवसात विना-अनुदानित एलपीजी सिलेंडर 50 रुपयांनी महागला आहे. आज म्हणजे एक सप्टेंबरला 25 रुपयांची वाढ करण्यात आली (LPG Cylinder Price) आहे.
यापूर्वी पेट्रोलियम कंपन्यांनी 18 ऑगस्टला गॅस सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ केली होती. दिल्लीत आता 14.2 किलोग्रॅम एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर दिल्लीत 14.2 किलोग्रॅमच्या एलपीजी सिलेंडरची किंमत वाढून 884.50 रुपये झाली आहे.
अनुदानाशिवाय 14.2 किलो सिलिंडरची नवी किंमत
दिल्लीमध्ये 14.2 किलो सिलिंडरची सबसिडीशिवाय किंमत 859.50 रुपयांवरून 884.50 रुपये झाली. कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत आता 875.50 रुपयांऐवजी 911 रुपये झाली, 900.5 रुपये मोजावे लागतील.
19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरची नवी किंमत
दिल्लीमध्ये 19 किलो व्यावसायिक गॅसची किंमत 1693 रुपये आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत कोलकातामध्ये 1,772 रुपये, मुंबईत 1,649 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,831 रुपये प्रति सिलिंडर आहे.
एलपीजी सिलिंडर यंदा 190.5 रुपयांनी महागले
सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या किमती बदलतात. वर्ष 2021 च्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीत दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 694 रुपये होती, जी आता वाढून 884.50 रुपये झाली. अशा प्रकारे एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत आतापर्यंत 9 महिन्यांत 190.50 रुपयांची वाढ झाली.