जामनेर प्रतिनिधी । राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी भारतीय जनता पक्षानं राज्यभर शंखनाद आंदोलन सुरू केलं आहे. या दरम्यान, आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीच्या वतीने जामनेर शहरातून ढोल टाळ व शंखनाद करून रॅली काढून घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी गिरीश महाजन यांनाही शहरातील भाजीमंडी भागात असलेल्या हनुमान मंदिराचा दरवाजा उघडत आत प्रवेश केला.
यावेळी धामणे शहरातून भाजपातर्फे ढोल टाळ व शंखनाद करून रॅली काढण्यात आली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नगरपालिका गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, नगरसेवक नाना बाविस्कर, नाना वाणी, सुहास पाटील, बाबुराव हिरवळे, बंटी वाघ, भाजपा तालुका सरचिटणीस रवींद्र झाल्टे, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष निलेश नाईक, सरचिटणीस सुभाष पवार, रामकिसन नाईक, अजय नाईक, पुखराज डांगे यांच्यासह मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना मोठमोठे कार्यक्रम घेतात राज्यातील डान्स बार बियर बार बाजारपेठे मॉल सिनेमा थेटर सर्व चालू आहे त्याच बरोबर दुसऱ्या राज्यात मंदिरे उघडे आहे. त्यामुळे फक्त महाराष्ट्रातच मंदिरात कोरोना येतो का असा सवाल करत भाजप कोणत्याही नियमांना घाबरणार नसून तुम्ही पोलिस उभे करा आम्ही आज पासून राज्यातील मंदिरे उघडे करू, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन दिली.
दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ओसरली असल्यानं आता काही निर्बंधांसह मंदिरं उघडावीत, अशी मागणी भाजपनं केली आहे.