मुंबई : कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सोनं आणि चांदीच्या दरात आज घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज सोने २०० रुपयांनी स्वस्त झाले. तर चांदीमध्ये २५० रुपयांची घसरण झाली आहे.
सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७३३० रुपये आहे. किलो चांदीचा भाव ६३७७६ रुपये आहे.
याआधी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये शुक्रवारी सोने दरात ३२० रुपयांची वाढ झाली होती. एमसीएक्सवर शुक्रवारी बाजार बंद होताना एक किलो चांदीचा भाव ६४०७२ रुपयांवर स्थिरावला होता. त्यात १०२८ रुपयांची वाढ झाली.
Goodreturns या वेबसाईटनुसार आज सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६५०० रुपये इतका आहे. २४ कॅरेटचा भाव ४७५०० रुपये झाला आहे. त्यात रविवारच्या तुलनेत १६० रुपयांची घसरण झाली. आज दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६६०० रुपये इतका झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५०८०० रुपये आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४८८० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८९६० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६९५० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९६५० रुपये आहे.