मुंबई : राज्यात गेल्या काही दिवासांपासून पावसाने उसंत घेतली होती. आता राज्यात पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टदेखील देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने ओढ दिली आहे. राज्यात तापमान एकदम वाढले असून उन्हाळा असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतातील उभी पिके धोक्यात आली असून शेतकरी संकटात सापडला आहे. अर्धा पावसाळा संपून गेला तरी राज्यातील अनेक धरणे तहानलेलीच आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने दिलेला हा इशारा पावसाच्या आशा पल्लवित करणारा ठरला आहे.
२९ ऑगस्ट- : गोंदिया, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
३० ऑगस्ट- जळगाव, बुलडाणा, अकोला, अमरावती, जालना, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, लातूर व रत्नागिरी
अंदाज : विजांच्या कडकडाटासह पाऊस. परभणी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट
३१ ऑगस्ट- नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, नागपूर, पालघर, मुंबई व रत्नागिरी
अंदाज : विजांसह पाऊस. नाशिक, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांला ऑरेंज अलर्ट
१ सप्टेंबर-: नंदुरबार, नाशिक, ठाणे, मुंबई आणि रायगड
अंदाज : चांगला पाऊस. पालघरला ऑरेंज अलर्ट